पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे पुत्र चि. विक्रम यांच्या हळदीच्या कार्यक्रमात आज मान्यवरांनी हजेरी लाऊन त्यांना आशीर्वाद दिला. उद्या पाळधी येथील साई मंदिर परिसरात हा विवाह पार पडणार आहे.
गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा सोमवारी विवाह सोहळा पार पडत आहे. चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत सोमवारी विक्रम यांचा पाळधी येथील साईबाबा मंदिरावर विवाह सोहळा पार पडत आहे.
दरम्यान, आज पाळधी येथील ना. गुलाबराव पाटील यांच्या राहत्या घरी विक्रम पाटील यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मान्यवरांसह आप्तजन व ग्रामस्थांची उपस्थिती होती. तर मान्यवरांनी उपस्थिती राहून चि. विक्रम आणि चिसौकां प्रेरणा यांना आशीर्वाद दिला. यात प्रामुख्याने नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर आदींसह अन्य मान्यवरांचा समावेश होता. पाटील कुटुंबातर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
दरम्यान, उद्या विवाहानिमित्त राज्यातील महत्वाचे मंत्री आणि बरेचचे आमदार विवाहानिमित्त पाळधी येथे येणार आहेत. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.