पाकिस्तानात आता बुरहान वाणीवर चित्रपट बनणार

amir liaquat

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) २०१७ सालात काश्मीरमध्ये सोशल मीडियाचा वापर करणारा दहशतवादी ‘बुरहान वाणी’ याच्या आयुष्यावर पाकिस्तानात चित्रपटाची निर्मिती करण्यात येते आहे. या चित्रपटात कराचीचा खासदार आमिर लियाकत हुसैन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

 

पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचा खासदार असलेला आमीर लियाकत हुसैन एक ‘शो होस्ट’ आहे. त्याच्या धार्मिक वक्तव्यांमुळे तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. ‘बुरहान वाणी काश्मीरचा खरा हिरो आहे. त्याची भूमिका वठवत असलो, तरी मी काही खरा हिरो नाही’असे अकलेचे तारे आमिर याने तोडले आहेत.

दिग्दर्शक आयुब खोसा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ‘आतापर्यंत भारतीय चित्रपटांमध्ये ज्याप्रकारे काश्मीर चित्तारले जाते त्याची जगभर चर्चा होते. पण मला खरं काश्मीर कसं आहे, हे जगाला दाखवायचे आहे. काश्मिरी चित्रपटांची जगात कुठेच चर्चा होत नाही’असे खोसा याचे म्हणणे आहे. २०१६मध्ये बुरहान वाणीने मोठ्या प्रमाणात तरुणांना दहशतवादाकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सैन्याने एका एन्काउंटरमध्ये त्याला ठार केले होते.

Add Comment

Protected Content