पाक खेळाडूंना खेळू देणार नाही – बीसीसीआय

bcci

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एक-एक मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली असून आणखी एक मोठा निर्णय गांगुलीने घेतलाय. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात मार्चमध्ये दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचे आयोजन केले असून यात एकही पाकिस्तानी खेळाडू खेळणार नाही, असे बीसीसीआयने गुरूवारी सांगितले आहे.

बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आणि २१ मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी सांगितले.

Protected Content