Home राष्ट्रीय पाककडून पुन्हा गोळीबार; १ जवान शहीद

पाककडून पुन्हा गोळीबार; १ जवान शहीद


bhartiy jawan shahid
जम्मू (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. हरी वाकर असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात हरी वाकर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यांनी शाहपूर आणि केरनी परिसराला लक्ष्य केले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound