जळगाव (प्रतिनिधी) ‘ जग बदलून घालुनी घाव , सांगून गेले मज भीमराव ,अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती घाव’ , असे शब्दालाही आपलंसं करून शब्दाला वाचा देणारे ,शब्दाची खाण , साहित्याची मान अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धेने साजरी करण्यात आली. तसेच यावेळी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते प्रतिमपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची ओळख करून देत त्यांची विविध गीते ,कविता ,पोवाडे ऐकवले. त्यानंतर विद्यार्थ्यांची एक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण 150 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तर पलक रमेश मिस्त्री , कृष्णा जितेंद्र सोनवणे व वैष्णवी सुनील सोनवणे यांनी बक्षिसे मिळवली. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव, सूर्यकांत पाटील व धनश्री फालक यांनी केले. तर सुधीर वाणी व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.