पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील स्मशानभूमी जवळील अतिक्रमण बाबत पहुर पेठ ग्रामपंचायत जवळ बेमुदत घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे.
वाघुर विकास आघाडीने आजपासून बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. या आधी आघाडीने पहुर पेठ ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, दिनांक १७ /२/२०२३ रोजी सुर्यवंशी बारी समाज व इतर समाज बांधवांनी आपणास वाघुर नदीमधील स्मशानभूमी जवळ होत असलेल्या अतिक्रमणा बाबत सूचना केली होती तरी आपण आपल्या स्तरावरुन सदरील अतिक्रमण होत आहे किंवा नाही हे समाधान कारक न सुचवल्यामुळे मी वरील अर्जदार या निवेदनाव्दारे सूचित करतो की २५/३/२०२३ पर्यंत होत असलेल्या अतिक्रमण बाबतीत योग्य ती कार्यवाही न केल्यास सूर्यवंशी बारी समाज व इतर समाज स्मशानभूमी करिता मी व सहकारी दिनांक २७ मार्च पासून ग्रामपंचायत पहुर पेठ जवळ जागर घंटानाद बेमुदत आंदोलन करणार आहे.
निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय जामनेर, पहुर पोलीस स्टेशन, पंचायत समिती जामनेर, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या निवेदनावर वाघुर विकास आघाडीचे सुकलाल बारी, अरुण बारी, ईश्वर बारी, माधव बारी, अर्जुन बारी, एकनाथ बारी, प्रभाकर बारी, सुकलाल बारी, अरुण बारी, ईश्वर बारी, माधव बारी, अर्जुन बारी, एकनाथ बारी, प्रभाकर बारी यांच्या सह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहे. हे निवेदन देऊन देखील कार्यवाही न करण्यात आल्यामुळे आज सकाळपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे,माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा, युवा सेना उपजिल्हाधिकारी राहुल चव्हाण, सुभाष पाटील ,गणेश पांढरे ,अशोक जाधव ,संजय तायडे ,शुभम घोलप आदी मान्यवर देखील या आंदोलनात सहभागी झाले.