पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या विजेच्या समस्यांनी शेतकरी हैराण झाले असून याच्या निषेधार्थ आज येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
पहूर येथे शेतकरी यांच्या शेतातील पहूर परिसरातील रोहित्र बंद करून शेतकर्यांचे रब्बी व खरीप पिके धोक्यात आल्याने आज शेतकरी व महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात पहुर बस स्टॅन्ड परिसरातून करण्यात आली मोर्चा बाजारपेठ, श्रीराम मंदिर गाडगेबाबा, महावितरण कार्यालय आदी ठिकाणी जाऊन उपविभागीय कार्यालय अधिकारी इंगोले यांना महाविकास आघाडी व शेतकर्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात एक तास लागेल या देशाचा अन्नदाता असणारा शेतकरी हा उन्हाळा थंडी पावसाळा असो आपल्या जीवाची बाजी लावून रात्रंदिवस आपल्या शेतात राब राब राबतो आधीच नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस पिकावरील रोगराई अशा संकटातून तोंड देत असताना आपल्याकडून झालेली शेत पंपाची तोडणी शेतकर्यांना अन्यायकारक असून शेतकर्यांचे रब्बी व खरीप पिके जळून जात असल्याने लवकरात लवकर शेत पंपाची वीज चालू करण्यात यावी तसेच संपूर्ण विज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे
दरम्यान, जाता उपविभागीय कार्यालय अधिकारी इंगोले यांनी एका तासात वीस पुरवठा सुरळीत करतो व तुमच्या इतर मागण्या वरिष्ठांना कळवतो असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील ,माजी शहर प्रमुख सुकलाल बारी, शिवसेना उपतालुकाप्रमुख ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी, इरफान शेख, शांताराम पाटील, शरद पांढरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेते किरण पाटील ,शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील, गणेश तायडे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमीन शेख , नाना पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, तोफिक तडवी, अर्जुन लहासे, माधव घोंगडे ,राहुल पाटील, समाधान पाटील, सुधाकर महाजन ,वसीम शेख , रतन क्षीरसागर यांच्यासह असंख्य शेतकरी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.