पहूर, ता. जामनेर- रविंद्र लाठे | तालुक्यातील सर्वात महत्वाच्या पहूरपेठ ग्रामपंचायतीत यंदा जोरदार चुरस दिसून आली. यात भाजपच्या उमेदवाराने सरपंचपद पटकावले असले तरी ग्रामपंचायत सदस्य हे राष्ट्रवादीचे बहुसंख्येने निवडून आले आहेत.
जामनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या असलेल्या पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अफझल (अब्बु)तडवी यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस मा. जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलने ११ जागा जिंकल्या तर भाजप पुरस्कृत नामदार गिरीश भाऊ महाजन व माजी जि प सदस्य राजधर पांढरे यांच्या लोकशाही ग्रामविकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले .
पहूर पेठमधील प्रभाग क्रमांक १ मध्ये चुरशीची लढत झाली . यात माजी जि प सदस्य राजधर पांढरे यांना पराभूत करत माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी विजय मिळवला. तसेच, सरपंच पती रामेश्वर पाटील यांचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला. दरम्यान, लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत अफजल उर्फ अब्बू इस्माईल तडवी यांना गाव बचाव पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार विनोद ठाकूर यांनी कडवी झुंज दिली. मात्र यात तडवी यांना यश मिळाल्याने ते सरपंचपदी विराजमान झालेत.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
लोकनियुक्त सरपंच – अफझल (अब्बु) इस्माईल तडवी २८६९ (भाजपा)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पहुर पेठ परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रदीप मोहनलाल लोढा , ( ७७७ )
मंगला मधुकर करवंदे , ( ९१६ )
वंदना श्यामराव सावळे , ( ८३४ )
शरद भागवत पांढरे , ( ५६१ )
रंजनाबाई कृष्णा पांढरे , ( ५२१ )
सचिन रामराव देशमुख ( ४२७ )
कलाबाई सुखदेव देशमुख ( ५५८ )
शेख आरीफ मो . बद्रूदीन ( ४८३ )
सुरेखा अनिल मोरे ( ४६ ५ )
काझी सबीनाबी निजामुद्दीन ( ५२३)
ईश्वर दौलत बारी ( ७४५)
भाजपा पुरस्कृत लोकशाही ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
राजू भावलाल पाटील (६७६ )
वाल्हाबाई बाबु तडवी ( ६५० )
सुनंदा प्रकाश पाटील ( ६८४)
महेश ( बंडू )अशोक पाटील ( ६२४ )
तडवी शेख चांद जलालोददीन ( ७६० )
शेख हिना कौसर सोहेल ( ७५ ८ )
निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आल्या.