पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूरसह परीसरात आज सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने पुन्हा पिकांचे नुकसान होणार आहे.
पहूरसह परीसरात अचानक वातावरणात बदल होवून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यंदा पावसाळ्यात खुप पाऊस झाला. आज झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल अर्धा तास हजेरी लावल्याने रब्बी हंगामात पेरणी व कापूस पिकांना मोठा फटका बसणार आहे.