अमळनेरात पाणीपुरवठा सुरळीत ठेऊन जनतेची तहान भागवा – आमदार चौधरी

amalner news

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहराच्या वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार शिरीष चौधरी यांनी नुकतीच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जळोद येथील तापी नदीवरील पाणीपुरवठा विभागाची पाहणी केली. योग्य नियोजनासह काहीही उपाययोजना करा मात्र अमळनेरकर जनतेला तहानलेले ठेऊ नका, अश्या सूचना अधिकाऱ्यांना करून यासाठी पाहिजे ती मदत देण्याची तयारी दर्शविली.

यावेळी आमदार शिरीष चौधरी सोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगावचे कार्यकारी अभियंता श्री निकम, उपअभियंता चोपडा सी.एस. पाटील, जळगावचे भूवैज्ञानिक अधिकारीं जवजांळ, अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, इजि हर्षल सोनवणे, कनिष्ठ अभियंता म जी प्राधिकरण अमळनेरचे पठाण तसेच नपचे गटनेते प्रविण पाठक, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, सुनिल भामरे, उमेश पाटील उपस्थित होते.

आमदारांनी यावेळी समक्ष पाहणी करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व अमळनेर कर जनतेला ३ दिवसा आड पाणी पुरवठा करावा अश्या योग्य सुचना व सर्वोतपरी मदत करण्यासाठी तयारी दाखविली. नगरपरिषदेत आ शिरीषदादा मित्र परिवाराची सत्ता असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातून जळोद पंपगृह येथे तब्बल १० बोअरवेल करून दिल्या होत्या,तेव्हापासून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीत याच बोअरवेल शहराला पाणी पुरवठा करीत आहेत, यंदाही जळोद येथील तापीच्या डोहातील पातळी घटल्याने याच बोअरवेलवरून पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली व नियोजनानुसार पहील्या सत्रात पाच बोअरवेल चालतात तर दुसऱ्या सत्रात दुसऱ्या पाच बोअरवेल चालविल्या जातात. यामुळे सुरळीत पाणीपुरवठा पालिका करू शकते असे त्यांनी स्पष्ट केल्याने आमदार चौधरी यांनी विशेष समाधान व्यक्त होत आहे.

Add Comment

Protected Content