नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात भीतीचे वातावरण असून लोकशाही धोक्यात आहे, असे सांगत उर्दू कवी मुज्तबा हुसेन यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
लोकशाही चिरडली जात असल्याने आपण पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले आहे. याआधी देशात असहिष्णुता निर्माण झाल्याचे सांगत साहित्यिकांसह अनेकांनी पुरस्कार परत केले होते. यानंदर देशात पुरस्कार वापसीची लाटच आली होती. मुजतबा हुसैन यांनी एएनआयशी बोलताना पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे.