पाचो-यातील युवक उद्या 300 वृक्षांची लागवड करणार

pachora 3

पाचोरा प्रतिनिधी । येथील युवक मित्र मंडळातर्फे उद्या दि. 28 जुलै रोजी भास्कर नगर व गाडगेबाबा नगर परिसरात 300 वृक्ष लागवड करण्यात येणार असून सर्वांनी सकाळी 9 वाजता उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याकार्यक्रमाला शहरातील सर्व मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार व पर्यावरणप्रेमी व रहिवासी उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश पाटील, सतीश देशमुख, प्रवीण पाटील व मित्र परिवाराने केले आहे. तसेच भडगाव रोड लगतच्या भास्कर नगर, गाडगेबाबा नगर, परिसरातील युवकांनी केवळ 300 झाडे लावून जबाबदारी न झटकता त्या झाडांसाठी समाजातून 300 ट्री-गार्ड प्राप्त केलेले आहेत. त्यामुळे १००% वृक्ष जगविण्याची हमी या मित्रांनी स्वयंस्फूर्तीने घेतली आहे. त्यांचा हा उपक्रम नव्या पिढीसाठी अत्यंत आदर्श असून शहरातील इतर तरुणांनी व मित्र मंडळांनी याचे अनुकरण करावे. त्यासाठी शहरात चर्चिले जात आहे. यासाठी, सर्व पत्रकार व विविध माध्यम प्रतिनिधींनी उद्या 28 रोजी सकाळी 9 वाजता भास्कर नगर स्टॉप, भडगाव रोड, पाचोरा येथे उपस्थित राहून युवकांच्या या प्रेरणादायी उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे नम्र आवाहन याद्वारे करण्यात आले आहे.

Protected Content