बापरे : भरधाव कारने चौघांना उडविले : दोन ठार, दोन जखमी !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनीधी | पाचोरा शहराकडुन जळगाव कडे जाणार्या चारचाकी वाहनाने गोराडखेडा गावाजवळ दोन शाळकरी मुली आणी वृध्दांना हिट ऍण्ड रन केल्याची घटना घडली.या भिषण घटनेत एक वृध्द व एक शाळकरी मुलगी जागीच ठार झाले असून एक वृध्दाला जळगाव हालवण्यात आले आहे.

या भीषण एका शाळकरी मुलीवर पाचोर्‍यात उपचार सरू आहे. ही घटना इतकी भिषण होती की,गाडित अडकलेल्या जखमीला बाहेर काढण्यासाठी गाडी उलटी करावी लागली.दरम्यान जळगाव कडन येणार्‍या पोलीस गाडीने तत्काळ हिट ऍण्ड रन करणार्‍या गाडीतिल चालकासह चार तरूणांना ताब्यात घेतले असून राञी उशिरापर्यंत गोराडखेडा ग्रामस्थांनी रस्ता रोको केला होता.

या बाबत प्राप्त माहीती अशी की, सायंकाळी ५:४५ वाजेच्या दरम्यान शाळेतुन मुले घरी येत असतांना, शेतातुन शेतकरी शेतमजुर घरी येत असतांना पाचोर्‍याकडन लाल कलरची स्विप्ट डिझायर ही गाडी भरधाव वगाने जळगाव कडे जात असतांना गोराडखेडा गावाच्या जवळ या कारने चौघांना उडविले.

याप्रसंगी पी. के.शिंदे शाळेत ९वी त शिक्षण घेणार्‍या दुर्वा भागवत पाटील (वय १५), ऋतुजा राजु भोईटे (वय १५) या सायकलीवर घराकडे येत होते. तर, सुभाष रामा पाटिल(६०) व परशुराम दगा पाटिल(५२) या चारही जणांना या कारने उडविले. या चौघांना चिरडत गावाजवळ ही कार थांबली. यात परशुराम पाटील यांना वहानासह गाडीत अडकल्याने गाडी थांबली.

अपघाताची ही घटना इतकी भिषण होती की,काही कळण्याच्या आतच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील हे जागीच ठार झाले.गावकर्‍यांनी गाडीने उडून दिलेल्यांना रस्त्यालगतच्या शेतातन अचलून आणण्या अगोदरच जळगाव कडुन येणार्‍या पोलीस गाडीने गाडीत बसलेल्या तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. दरम्यान परशुराम पाटिल यांना उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले असुन ऋतुजा राजु भोईटे या मुलीला पाचोर्‍यात उपचार सुरू आहे.

Protected Content