पाचोरा प्रतिनिधी । वरखेडी ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड खुर्द येथे माळी समाज मंगल कार्यालयात नुकतीच वाघ्या मुरळी, भजनी मंडळ व वही गायन कलावंत परिषदेची बैठक संपन्न झाली.
बैठकीत कलवंत मानधन समितीचे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शासनाकडून कलावंतांना मानधन सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा सर्व कलावंत त्यात वही गायन, भजनी मंडळ व वाघ्या मुरळी या कलावंतांना सामावून घेतले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. तसेच विविध संघटनेतील कलावंत यांचे मूलभूत प्रश्न आदी समस्यांकडे शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असा सुर बैठकीत निघाला.
बैठकीस उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र अहिरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश वाघ, सुनील सरदार, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, विकास वाघ, अशोक कांबळे, संतोष मोरे, भडगाव तालुका अध्यक्ष पोपत सोनवणे, सुनिल कोळी, भगवान मोरे, अशोक महाजन (वाडेकर), सुपडू मोरे, युसुफ खाटीक आदी कलावंतांची उपस्थिती दिली.
बैठक यशस्वीतेसाठी गावातील नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष मोहन लोहार, दशरथ माळी, संजय पाटील, संभाजी जगदाळे व आदी कलावंतांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तर गावातील स्थानिक सरपंच कैलास भगत, ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रदीप महाजन, कौतिक पाटील, कैलास चव्हाण, संतोष चौधरी व अरुण पाटील यांनी प्रयत्न केले. यावेळी गावातील वही गायन कलावंत व भजनी मंडळ तसेच वाघ्या मुरळी कार्यकर्त्यांतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.