पाचोरा, प्रतिनिधी | येथील एस.एस.एम.एम. कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. गिरीश युवराज पाटील यांची तालुका क्रीडा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी त्यांच्या सहीचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे.
या त्यांच्या नियुक्तीबद्दल पी.टी.सी. संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, मानद सचिव अँड.महेश एस. देशमुख, कनिष्ठ महाविद्यालय व्य.स. चेअरमन नाना देवरे, संचालक डॉ. जयवंतराव पाटील, प्राचार्य डॉ.बी.एन. पाटील, उपप्राचार्य एस.एम. पाटील, प्रा.जी.बी. पाटील, प्रा.एस.आर. मांडोळे व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.