पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा हादरून सोडणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या नराधम बापाला अटक केल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरण पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एक गावात पिडीत मुलगी ही तिची आई व वडीलांसह वास्तव्याला आहे. आई मोलमजूरी व बकऱ्या चारण्याचे काम करून उदरनिर्वाह करतात. पिडीत मुलगी ही १५ वर्षाची असल्याने ती देखील घरकामात हातभार लावते. २०१९ मध्ये अल्पवयीन मुलगी १२ वर्षाची असतांना नराधम बाप हा घरी कुणीही नसतांना मोबाईलवर कपडे काढलेले अश्लिल व्हिडीओ दाखवत होता. हा प्रक्रार किळसवाना प्रकार असला तरी बाप असल्यामुळे मुलीने काहीही न बोलता सर्व सहन केले. हा प्रकार आजपर्यंत सुरूच होता. दरम्यान, मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी पिडीत मुलीची आई ही बकऱ्या चारण्यासाठी बाहेर गेली. त्यामुळे मुलगी घरी एकटीच होती. दुपारी बकऱ्या चारून तिची आई घरी आल्यावर पिडीत मुलगी घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती. ती रडत असल्याचे आईला समजल्यानंतर तिला रडण्याचे कारण विचारले. तिने आपल्यावर घडलेला सर्व प्रकार आईसमोर कथन केला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकल्यावर आईच्या पायाखालची वाळू सरकली. पिडीत मुलीसह तिच्या आईने थेट पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशीरा पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम बापाला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधिक्षक भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहे.