पाचोरा प्रतिनिधी । येथील संघवी कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्रात गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
आज दि. २३ रोजी गुरू पोर्णिमेनिमित्त सकाळ पासुन भाविकांनी श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षिततेचे सर्व नियम पाळुन भाविकांनी गुरु माऊली स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत गुरु पुजन करण्यात आले. १०:३० वाजता नैवेद्य आरती झाल्यानंतर १०:३० ते सायंकाळी ५:४५ पर्यंत गुरु पुजन संपन्न झाले. यावेळी परिसरातील सुमारे १००० तै १२०० भाविकांनी श्री. स्वामी समर्थ महाराजांना गुरु केले. सायंकाळी ६:३० वाजता नैवेद्य आरती होवुन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. आरती नंतर सेवेकरी राम जळतकर यांनी गुरु पोर्णिमेचे महत्व उपस्थित सेवेकरांना सांगितले. गुरु पोर्णिमे निमित्त आयोजित कार्यक्रमा दरम्यान सर्व शासकीय नियमानुसार तंतोतंत पालन करण्यात आले होते.