निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगले ‘अभिरूप न्यायालय’

पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाची ओळख व्हावी यासाठी येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले.

पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल ही नेहमीच विदयार्थ्याना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील कौशल्ये विकसित कण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजेच अभिरूप न्यायालय होय.
न्यायालयातील कामकाजाची पध्दत आणि कौशल्यपूर्ण संभाषण हे विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांनी अभिरूप न्यायालयातील कामकाजात कृतियुक्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करण्यासाठी पाचोरा न्यायालयाचे दिवाणी मुख्य न्यायाधीश जी. बी. औंधकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विदयार्थ्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचे मनापासून कौतुक केले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, सी. बी. एस. ई. समन्वयक सौ. स्नेहल पाटील, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण पाटील, वकील संघाचे सचिव अ‍ॅड. राजेंद्र पाटील, ऍड. जे. डी. काटकर, अ‍ॅड. डी. आर. पाटील, अ‍ॅड. एस. पी. पाटील तसेच पाचोरा न्यायालयाचे सर्व विधिज्ञ आणि शाळेतील विदयार्थ्याचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतेले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेतील शिक्षिका शितल मोराणकर यांनी केले. तर उपस्थितांचे उपप्राचार्य प्रदिप सोनवणे यांनी मानले.

Protected Content