Home धर्म-समाज राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त गरीबांना पुरणपोळीचे भोजन

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त गरीबांना पुरणपोळीचे भोजन

0
50

पाचोरा प्रतिनिधी । राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त आज येथे गोर-गरिबांना पुरणपोळीचे भोजन देण्यात आले.

येथे आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी १० वाजता माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर संभाजी युवा फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या आधार वड येथे निराधार गोरगरिबांना संभाजी बिग्रेडचे प्रविण पाटील यांच्या तर्फे पुरणपोळी, खीर, आमटी, भात असे गोड जेवण देण्यात आले.

यावेळी संभाजी बिग्रेडचे गणेश पाटील, जिभाऊ पाटील, मुकेश तुपे, राजे संभाजी युवा फाऊंडेशन व आधारवड चे प्रवीण पाटील, राहुल पाटील, राहुल देवरे, भूषण देशमुख, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष एस. ए. पाटील, माळी समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, ज्ञानेश्‍वर महाजन; उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपचे सचिन पाटील, गणेश शिंदे, उपाध्यक्ष गोरख महाजन, सचिन पाटील, योगीराज पाटील, बबलू जाधव, दिलीप कासार, अनिल भोई, रवी ठाकूर, अमोल सोनवणे, जितेंद्र सावळे, सुधाकर महाजन, पप्पु जाधव (फुल वाले), अमृत पाटील, गोकुळ पाटील सह मोठ्या संख्येने विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Protected Content

Play sound