पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील पी. जे. बचाव कृती समितीतर्फे जे. पी. जे. रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाला एक लाख सह्यांचे निवेदन देण्यासाठी आज पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले आहे.
यासाठी पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी कृती समितीचे खली दादा देशमुख, अविनाश भालेराव, पप्पू राजपूत, विधीतज्ञ अॅड. अण्णा भोईटे, भरत खंडेलवाल, संजय जडे, प्रा. गणेश पाटील, बशीर बागवान, प्रताप पाटील, सुनिल शिंदे, रणजीत पाटील, अनिल (आबा) येवले जि.प. गटनेते रावसाहेब पाटील, बँकेचे संचालक अविनाश कुडे, मुख्याध्यापक संघाचे गोकुळ पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पटवारी, वकील संघाचे अॅड. अभय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे, जमील सौदागर, एकता आटो रिक्षा संघटनेचे एकनाथ सदानशिव, देवीदास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गणेश पाटील, गुरुलाल पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.