पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ मैदानावर रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथील भडगाव रोडवरील शिवतीर्थ मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी आयोजित रंगभरण स्पर्धा १ ली ते ४ थी अ गट, ५ वी ते ७ वी बी गट, ८ वी ते १० वी क गट व ११ वी ते पदवीधर ड अशा चार गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. चित्रकला रंगभरण स्पर्धेत आपल्या कलागुणांतुन अप्रतिम चित्र रंगविण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भडगाव रोडवरील शिवतीर्थ मैदानावर पार पडला.
याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, शहर प्रमुख ऍड. दिपक पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती उद्धव मराठे, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, मंदाकिनी पारोचे, संदिप जैन, निर्मल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, संतोष पाटील, नंदू पाटील उपस्थित होते. या रंगभरण चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सुमारे ८०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बाफना यांनी केले. तर सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेंद्र राणा यांनी मानले.