पाचोरा न्यायालयात वकिलांनी एकत्र येत साजरा केला शिवजन्मोत्सव !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या वतीने पाचोरा दिवाणी न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वकील बांधवांनी एकत्र येत पहिल्यांदाच न्यायालयात शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला.

कार्यक्रमाचे स्वरूप:
या महोत्सवाचे अध्यक्ष सीनियर एडव्होकेट एस. पी. पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भाग्यश्री महाजन यांनी केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि फुले अर्पण करून सर्व वकील बांधवांनी महाराजांना अभिवादन केले. ॲड. अनिल पाटील, ॲड. अण्णासाहेब देशमुख, दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाटील तसेच चिमुकला नक्षत्र प्रशांत येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व उपस्थित वकील बांधवांना शिवबा मेडिकल स्टोअर्स पाचोरा यांच्यातर्फे एक जूट बॅग आणि शिवप्रतिमा सप्रेम भेट देण्यात आले. त्यानंतर अल्पोपाहाराचा कार्यक्रम झाला. सर्व उपस्थित वकील बांधव आपापल्या मोटरसायकलवर रॅली काढत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले. सर्वांनी महाराजांना अभिवादन केले आणि मग एकमेकांचा निरोप घेतला.

प्रथमच शिवजयंती साजरी:
पाचोरा न्यायालयात स्थापनेपासून आतापर्यंत छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात नव्हती. त्याची सुरुवात आज पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व वकील बांधवांनी एकत्र येऊन केली.

आयोजन आणि सहभाग:
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. अंकुश कटारे, ॲड. बबलू पठाण, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. रवींद्र ब्राम्हणे या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ॲड. रणसिंग राजपूत, ॲड. शांतीलाल सैंदाणे, ॲड. रवी राजपूत, ॲड. दीपक पाटील, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. सचिन देशपांडे, ॲड. मानसिंग सिद्धू, ॲड. स्वप्नील पाटील, ॲड. रोशन, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड. गोपाल पाटील, ॲड. पी. डी. पाटील, ॲड. कालिदास गिरी, ॲड. अविनाश सुतार, ॲड. ललित सुतार, ॲड. सायली, ॲड. राजू वासवानी, न्यायालयातील दीपक तायडे यांच्यासह इतर वकील बांधव उपस्थित होते. कलाशिक्षक सुवर्णा पाटील यांनी सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाला विशेष रंगत दिली. सचिव ॲड. सुनील सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content