पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिंदाड शिवारातून कापूस चोरणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नितीन परमेश्वर पाटील (वय – ३६) रा. शिंदाड ता. पाचोरा यांचेसह ५ शेतकर्यांचा नितीन पाटील यांच्या शिंदाड गावातील गावठाण मध्ये गव्हले रोडवरील प्लॉट मधील पत्र्याच्या गोडावून मधून नितीन पाटील यांच्या मालकीचा ४० हजार रुपये किंमतीचा ५ क्विंटल कापुस, उमराव बालचंद परदेशी यांचा १ लाख २० हजार रुपये किंमतीचा १५ क्विंटल, शालिक आनंदा पाटील यांचा ४० हजार रुपये किंमतीचा ५ क्विंटल, अशोक गिरधर चौधरी यांचा १६ हजार रुपये किंमतीचा २ क्विंटल, व हरि अमृत चौधरी यांचा ५६ हजार रुपये किंमतीचा ७ क्विंटल असा एकुण २ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा ३४ क्विंटल कापूस फिर्यादी चे गोडावून चे मागील बाजूचा एका पत्र्याचे नट काढून व पत्रा वर उचकवून गोङावून मध्ये प्रवेश करून कपाशी चोरुन नेल्याची घटना दि. १५ ऑक्टोबर २०२२ चे सायंकाळी ६ वाजेचे ते दिनांक दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ८ वाजेच्या दरम्यान घडली होती.
या प्रकरणी पिंपळगांव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गु. र. नं. ३१ / २०२३ भा. द. वि. कलम ४६१, ३८० प्रमाणे दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग अभयसिंग देशमुख, पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शना खाली पथक नेमण्यात आले. यात सहाय्यक फौजदार रामकृष्ण कौतिक पाटील यांचेकडे देण्यात आला होता. यासोबत पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, मुकेश लोकरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजीत पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, अरुण राजपुत, दिपकसिंग पाटील, अभिजित निकम, प्रशांत पाटील, अमोल पाटील, संदीप राजपुत यांचा या पथकात समावेश होता.
दरम्यान, या पथकाने तपासाची चक्रे फिरवरून समीर जलाल तडवी (वय – १९ वर्षे), शकील मुश्ताक तडवी (वय – २२ वर्षे), अफसर दगडु तडवी (वय – १९ वर्षे), ईमान सलीम तडवी (वय – २६ वर्षे), शकील बिस्मिल्ला तडवी (वय – ३१ वर्षे), विनोद कचरु तडवी (वय – ३६ वर्षे), रहीम मुश्ताक तडवी (वय – २३ वर्षे), अनिल दिलावर तडवी (वय – २५ वर्षे), अस्लम हुसैन तडवी (वय – २१ वर्षे) सर्व रा. शिंदाड यांना ताब्यात घेवुन गुन्ह्या कामी अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.