Home Cities पाचोरा ना. महाजन यांचे अमोल शिंदे यांनी केले स्वागत

ना. महाजन यांचे अमोल शिंदे यांनी केले स्वागत

0
36

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गिरीश महाजन यांचे पाचोरा रेल्वे स्थानकावर भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व सहकार्‍यांनी स्वागत केले.

तीन दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना. गिरीश महाजन हे आज सकाळी महानगरी एक्सप्रेसने जिल्ह्यात आले आहेत. जळगावला ते दाखल होण्यापूर्वी पाचोरा रेल्वे स्थानकावर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ना. महाजन यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि सहकार्‍यांनी पाचोरा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर ना. गिरीश महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound