जळगाव प्रतिनिधी – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए. टी. झांबरे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केसीई अध्यापक विद्यालयाच्या शिक्षिका साधना झोपे यांच्याहस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यानी सूंदर अशी भाषणे या वेळी केली. महात्मा फुले हे खरे ज्ञानसूर्य आहेत ज्यांनी दिन दुबळ्या लोकांसाठी शाळा सुरू करून गुलामीपासून मुक्ती मिळण्याचे दार उघडे करून दिले. त्यांच्या कृपेने आज सर्व महिला शिक्षण घेऊन सक्षम बनलेल्या आहेत. आपण सर्व सदैव त्यांच्या ऋण फेडण्याचा प्रयत्न शिक्षणाचा प्रसार प्रचार करुनच करू शकतो अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी त्यांचे महात्म्य व्यक्त केले. पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनचरित्र्याची माहिती सांगितली. प्रसंगी मुख्या.डी. व्ही.चौधरी , सरला पाटील, सूर्यकांत पाटील, सुजाता फालक, नरेंद्र पालवे, लोखंडे मॅडम, एकनाथ पाचपांडे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.