मी आज मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीय : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज फक्त छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांचा शपथविधी होईल. मी आज शपथ घेणार नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या चर्चेनंतर अजित पवार स्वत: पत्रकारांशी बोलले. यावेळी पवार यांनी सांगितले की, जे बोलायचंय ते योग्यवेळी सविस्तर बोलेन. मी कालही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो, आजही आहे आणि उद्याही राहिन. मी यापूर्वीही नाराज नव्हतो, नाही आणि नसेन, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आज आपण मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बहुमत चाचणी आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच आपण मंत्रिपदाची शपथ घेऊ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Protected Content