जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगाव येथे पालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.
सदर सभेची सुरुवात शाळेचे उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांनी सरस्वती वंदनेने केली तर गेल्या दोन वार्षीपासून शाळा बंद पण शिक्षण सुरू या प्रणालीनुसार शाळेत घेतला गेलेला ऑनलाइन अभ्यास तसेच विविध उपक्रमांची ओळख उपशिक्षक योगेश भालेराव यांनी पीपीटीच्या माध्यमातून पालकांना करून दिली. प्रत्येक इयत्तेनुसार धनश्री फालक, स्वाती पाटील, कल्पना तायडे, सरला पाटील यांनी वर्षभरात अभ्यासाचे नियोजन कसे असेल याबाबतची माहिती दिली तर वर्षभरातील शालेय सहशालेय उपक्रम, शाळेची शिस्त, विविध समित्या यांची माहिती मुख्या.रेखा पाटील यांनी पालकांना दिली.
प्रत्येक वर्गातील एका पालकांची निवड पालक प्रतिनिधी म्हणून करण्यात आली त्यानंतर एक पालक प्रतिनिधी म्हणून जयवंत खैरनार यांनी आपले मत व्यक्त केले तर केसीई संस्थेचे शालेय शिक्षण समन्वयक यांनी ‘पालक म्हणून आपली भूमिका कशी असावी ‘ याबद्दल मार्गदर्शन केले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.