प.वि.पाटील विद्यालयात शिक्षक दिनी विविध उपक्रम

pavi patil vidyala

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजेच शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गावर विविध विषयांचे अध्यापन केले.

सर्वप्रथम शाळेचे आजचे मुख्याध्यापक इयत्ता चौथीचा विद्यार्थी कार्तिक दत्तात्रय पवार, शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, संस्थेच्या मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे, मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्याहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांना कवायतीसोबतच खेळ, गाणी, नृत्य चित्रकला अशा विविध विषयांचे मार्गदर्शन केले. त्यांच्यात जणू उद्याचे भावी शिक्षकच सर्वाना गवसले. शाळेच्या घंटेपासून ते कार्यलयाच्या कामकाजापर्यंत सर्व नियोजन विद्यार्थी शिक्षकांनीच केले. त्यांनतर सर्व शाळेतील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन पालक शिक्षक संघातर्फे सत्कार करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता मतदानाची शपथ सर्व पालक व शिक्षकांनी ग्रहण केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, सुजाता फालक, सूर्यकांत पाटील, सरला पाटील, कल्पना तायडे, दिपाली चौधरी, सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content