प. वी. पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमा तसेच लोकमान्य टिळक जयंती साजरी

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वी पाटील विद्यालय एम. जे. कॉलेज येथे गुरुपौर्णिमा तसेच लोकमान्य टिळक जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास रणधीर तसेच सदस्या प्रियंका फेगडे यांच्या हस्ते महर्षी व्यास तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमानिमित्त ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले त्यात इयत्ता पहिली प्रथम-अनुश्री चौधरी ,द्वितीय दुर्वा पाटील ,तृतीय नयन चौधरी ,आणि उत्तेजनार्थ गुंजन पाटील .इयत्ता दुसरीचे प्रथम वैष्णवी पाटील, द्वितीय उदय सोमवंशी ,तृतीय चिराग पाटील आणि उत्तेजनार्थ काव्या फेगडे इयत्ता तिसरीचे प्रथम शाष्वत कुलकर्णी , द्वितीय राज कोल्हे , आणि तृतीय मानवी पाटील तसेच उत्तेजनार्थ पूजा सुतार . इयत्ता चौथीचे प्रथम दिशा पाठक , द्वितीय हर्षिता पाटील ,  तृतीय सुमित सोनवणे तर उत्तेजनार्थ सोनम देवरे यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शालोपयोगी वस्तू देऊन गौरविण्यात आले.

मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी आरुणीची देशभक्ती ही कथा यावेळी सांगितली तर अनुश्री चौधरी या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी ने लोकमान्य टिळकांविषयी सुंदर असे भाषण केले. या स्पर्धेचे परीक्षण रवींद्र माळी यांनी केले प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

Protected Content