जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरू हाच कल्पतरू ‘ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्याहस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘वडे से बडा’ आणि ‘सायंदेवाची गुरुसेवा’ या सुंदर नाटिका सादर करून विद्यार्थ्यांना गुरू महात्म्य पटवून दिले. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी गुरू महिमा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन चारुलता वायकोळे व इंदू चौधरी यांनी केले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.