प.वि. पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प.वि. पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

कार्यक्रामात शाळेच्या ज्येष्ठ उप

शिक्षिका सरला पाटील यांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने भाषणे केली. यावेळी ज्येष्ठ उपशिक्षीका सरला पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देत त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. यावेळी इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांची ओळख करून देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य समजावून सांगितले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content