Home Cities जळगाव प.वि. पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

प.वि. पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी


जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रम हे ऑनलाइन आयोजित करण्यात आले सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यावेळी ऑनलाइन भाषणांचा तसेच गीतांचा कार्यक्रम आयोजित केला यात शाळेच्या बाल चिमुकल्यांनी लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणांमधून दिली. 


Protected Content

Play sound