मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगरासह तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून तात्काळ ऑक्सीजन उपलब्ध व्हावे, अशी मागणी मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक योगेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांचे आकडा वाढत आहे. दररोज 45 ते 50 कोरोना बाधित रुग्णसंख्या निघत आहे. त्यामुळे मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालय आवर्ती याचा परिणाम होत आहे, दररोज कोरोना पॉझिटिव्ह दाखल होणाऱ्या रुग्णांना मुळे ऑक्सिजनचा तुटवडा सध्या जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सीजन लागत आहे. जळगाव येथून ऑक्सिजन पुरवठा होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन मिळण्यास विलंब होत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या जीवावर ही बेतत असल्याचे मत मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक योगेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या सहकार्याने दहा लक्ष रुपयाचा निधी जमवून जम्बो ऑक्सीजन प्रणाली ग्रामीण रुग्णालयांमध्ये उभे करण्यात येणार असल्याचे नुकतेच घोषित केले आहे यामुळे हे प्रणाली त्वरित अस्तित्वात आली तर कोरोना बाधित रुग्णांचे जिव वाचणार असल्याचेही मत योगेश राणे यांनी व्यक्त केले आहे.