चाळीसगाव प्रतिनिधी । ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रूग्ण हे दगावत असल्याच्या घटना समोर येत असताना आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून नुकतीच येथील ट्रामा केअर सेंटरला मेडिकल ऑक्सिजन गॅस ड्युराचे दोन सिलेंडर दाखल झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयाने मोकळा श्वास घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांचे ऑक्सिजनच्या अभावामुळे प्राणज्योत मावळत आहे. हि गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेतले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांमुळे व सिव्हिल सर्जन डॉ. ऐन. एस. चव्हाण यांच्या सौजन्याने दोन ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर ट्रामा केअर सेंटरला उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोरोना बांधीत रूग्णांची गैरसोय दूर होऊन मृत्यू दरात घट होणार आहे. ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर ट्रामा केअर सेंटरला उपलब्ध झाल्याने सिलेंडर भरण्यासाठी लागणारा वेळ वाचून रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था झाली आहे. ड्युरा सिलेंडर दाखल करण्यापर्यंत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांची मोलाची मदत मिळाली असल्याचे प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
दरम्यान मंदार डॉ. करंबेळकर यांनी तातडीने ड्युरा सिलेंडर रात्री 12 वाजता पोहोचल्यावर निलेश गायकवाड यांच्या सत्यम ग्रुपच्या मदतीने सिलेंडर इच्छीत जागेवर हलविण्यात आले. तसेच सिलेंडर बसवण्यासाठी पाईपलाईन मधील बदल सुनील साळुंखे यांनी रात्री 3 वाजेपर्यंत परिश्रम घेऊन पूर्ण केले. सर्वांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर दाखल झाल्याने तालुक्यातील जनतेचा आनंद द्विगुणित झाला आहे.