ऑक्सिजन सिलेंडर कितीही लागो पुरवठा करणार – नगरसेवक पिंटू कोठारी

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव शिवारातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाल मागील वर्षी जिल्ह्याधिकारी व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते. आज रोजी या रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले असून यामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांनी नगरसेवक पिंटू कोठारी सोबत संपर्क साधला असता काही वेळेतच ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले असून रुग्णालयाला कितीही ऑक्सिजन सिलेंडर लागल्यास पुरवठा करणार, असे नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी म्हणाले.

सध्या जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.दिवसेन – दिवस परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे.प्रशासनाने भुसावळ तालुक्यातील नागरीकांच्या सेवेसाठी  

ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केल्याने नागरिकांना महागड्या उपचारापासून दिलासा मिळण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून रुग्णालय सुरू करण्यात आले होते.पण आजरोजी ज्या पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालय सुरू केले ते अचानक दिसेनासे झाले असून या रुग्णालयात कोविड बाधित रुग्ण  उपचार घेत असतांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली असून हा तर नाव मोठे लक्षण खोटे असा प्रकार दिसत आहे.याकडे राजकीय पुढारी मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्यामुळे आजरोजी रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर तुटवडा भासत आहे.

कदाचित येणारे अनुदान बंद झाल्याने प्रशासन व पुढारी दुर्लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही?

कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून भुसावळ शहरातील  नगरसेवक निर्मल रमेश कोठारी (पिंटू) नागरिकांची अखंड सेवा कुठलीही अपेक्षा न ठेवता करणारे एकमेव नगरसेवक असून दिवस-रात्र आपले कार्य सुरळीत पणे करीत आहे.ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या भावाने नगरसेवक पिंटू कोठारी यांच्याशी संपर्क साधून ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा होत असल्याबाबत माहिती सांगताच वेळेचा विलंब न करता स्वतःच्या खर्चाने मालवाहतूक रिक्षाने ऑक्सिजन सिलेंडरच साठा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे उपचार घेणारे रुग्णांना दिलासा मिळाला असून सर्व रुग्ण सुखरूप आहेत.नगरसेवक पिंटू कोठारीमुळे हे शक्य झाले असून ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला कितीही ऑक्सिजन सिलेंडर लागल्यास नगरसेवक पिंटू कोठारी पुरवठा करणार आहे.

 

Protected Content