Home क्राईम संतापजनक ! दोन नराधमांनी मुलाच्या डोळयादेखत केला मजुर महिलेवर अत्याचार

संतापजनक ! दोन नराधमांनी मुलाच्या डोळयादेखत केला मजुर महिलेवर अत्याचार


धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एक महिला मजुरीचे काम संपवून रात्री सटाणा येथून आपल्या मुलासह घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, वाटेतच तिच्यासोबत भयानक घडले. रात्री गावी जाणारी बस सुटली आणि महिला खासगी वाहनाची वाट पाहात बसली होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ती आपल्या मुलासह वाहनाची वाट पाहात थांबली होती. वाहन मिळाले नाही मात्र तिच्यासोबत दोघांनी अतिशय धक्कादायक कृत्य केले.

या आदिवासी मजूर महिलेवर रविवारी रात्री दोन व्यक्तींनी बैलबाजार मार्केटमधील शेडमध्ये आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, हे सगळे तिच्या मुलाच्या डोळ्यादेखत घडले. यानंतर गस्तीवर असलेले पोलीस पीडितेला भेटले आणि तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. यानंतर काही वेळात पोलिसांनी निलेश निकम आणि स्वप्निल वाघ या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घटनेतील पीडित महिला ही नवापूर तालुक्यातील असून ती 39 वर्षांची आहे. महिला सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेलेली होती. काम संपल्यानंतर घरी परतण्यासाठी ती आपल्या मुलासह वाहनाची वाट पाहात असतानाच ही घटना घडली. दोघेही आठ वाजतापासून या ठिकाणी वाहनाची वाट पाहात थांबले होते. रात्री ११ वाजताच्या आसपास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ आली. यातील चालक आणि एका व्यक्तीने महिलेची विचारपूस करत तिला ओढत बैल मार्केटमधील ओट्यावर नेले. तिथेच दोघांनी तिच्या मुलादेखत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात दोन संशयितांना जेरबंद करण्यात आलं असून पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत


Protected Content

Play sound