संतापजनक : अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ व्हायरल करून बदनामी

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका गावात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमासंबंधातून काढलेले व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका खेडेगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. संशयित आरोपी नयन भालेराव याच्यासोबत प्रेम संबंध आहेत. दरम्यान सन २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यानच्या काळात संशयित आरोपी नयन भालेराव याने पिडीत मुलीला सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करून तिच्या मनाविरूध्द तिचे काही व्हिडीओ काढण्यास भाग पाडले, त्यानंतर हे व्हिडीओ नयन भालेराव याने मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करून घेतले. त्यानंतर पिडीत मुलीशी जवळीत साधण्याचा प्रयत्न केला. याला मुलीने विरोध केला. त्यानंतर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने त्याच्यासोबत बोलणे सोडून दिले. तरी देखीन नयत भालेराव हा तिच्या पाठलाग करत तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने तो व्हिडीओ त्याचा ओळखीचा कृष्णा संदीप राठोड रा.जळगाव याला पाठूवन तिची समाजात बदनामी केली. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलीने पालकांच्या मदतीने थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नयन भालेराव आणि कृष्णा राठोड दोन्ही रा. जळगाव यांच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content