जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुका व परिसरातील रुग्णांची व नागरीकांची गरज ओळखून आता दोन वेळा बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध राहणार आहे.
शहरी/ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा/आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी. याकरीता 30 सप्टेंबर, 2019 पासून ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागाच्या वेळेत बदल करून सकाळी 9 ते दुपरी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अशाप्रकारे दिवसातून दोन वेळेस ओपीडी सुरू राहणार आहे. एरंडोल आणि परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-1, ग्रामीण रुग्णालय, एरंडोल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.