… अन्यथा कुस्तीगीर यांना मानधन सुरु करण्याची मागणी

वरणगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कुस्तीचे फड बंद असल्यामुळे मल्लांना कुस्तीमधून मिळणारे मानधन बंद झाले आहे. यासाठी शासनाने कुस्तीचे फड चालू करावे, अन्यथा कुस्तीगीर यांना मानधन द्यावे, अशी मागणी पैलवान वस्ताद यांनी केली आहे.

ऑलिंपिक स्पर्धेतून कुस्तीसाठी भारताला कांस्यपदक मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रातील मल्ल खुराका पासून वंचित राहत आहेत. गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कुस्तीचे परत बंद आहे. त्यामुळे कुस्तीतून मिळणारे मानधन बंद झाले आहे. गोरगरिबांचे कुस्तीमध्ये नशीब अजमावत आहेत. परंतु कुस्तीचे फड बंद झाल्यामुळे खुराकासाठी लागणारा पैसा तोही बंद झाला आहे. त्यामुळे शरीर सांभाळण्यासाठी जो खुराक लागतो तो मिळत नाही. महाराष्ट्र शासनाने कुस्तीचे फड सुरू करावेत अन्यथा कुस्तीगिरांना मानधन सुरू करावे, अशी मागणी वस्ताद व पहिलवान यांच्यातर्फे करण्यात आली आहे. 

 

Protected Content