भुसावळ, प्रतिनिधी | पूर्व निमाड़ चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि डीआरयूसीसी, खंडवा यांच्या सदस्यांनी खंडवा रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांना कपड्यांच्या पिशव्या वाटप केल्या आणि स्वच्छता मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.
नेहरू माँटेसरी एच.स्कूल, बुरहानपूर येथील विद्यार्थ्यांनी बुरहानपूर रेल्वे स्थानकात स्वच्छता रॅली काढून प्लास्टिकचे दुष्परिणाम विषद केले आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगून स्वच्छतेची शपथ घेतली. ज्यामध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे विभागीय व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, विभागीय कार्मिक अधिकारी एम.के. गायकवाड, विभागीय यांत्रिकी अभियंता सुजितकुमार सिंग आणि सहाय्यक विभागीय यांत्रिकी अभियंता शेख असलम जावेद उपस्थित होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. भुसावळ रेल्वे विभागात, रेल्वे बोर्डाच्या परवानगीने भुसावळ, जळगाव, अमरावती, चाळीसगाव, धुळे, बुरहानपूर, मलकापूर, शेगाव, अकोला आदि रेल्वे स्टेशन येथे प्लास्टिकमुक्त मोहीम राबविण्यात आली. भुसावळ येथे स्वच्छता पंधरवाडा निमित्त चित्रकला, घोषकव्य स्पर्धा, कविता व गाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ प्रसाधन सामग्री अभियानांतर्गत भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानक आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता करण्यात आली.