यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकावरील श्री कालभैरव मंदीरात सालाबादाप्रमाणे ‘महाशिवरात्री निमित्ता’ने दर्शनासाठी शिवभक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावल येथील बसस्थानक परिसरात असलेल्या श्री .काळभैरव मंदीरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य रोषणाई व सजावट करण्यात आली होती. आज सकाळी ८ वाजेपासून मंदीरात दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली. याप्रसंगी दर्शनार्थी भाविकांसाठी तरूण मित्र मंडळाच्या वतीने साबुदाना फराळ आणि केळी वाटप करण्यात आली.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या संपूर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सागर पवार, दिपक मंदवाडे, सिद्धांत घारू, संदीप माळी, आकाश कोळी, लखन पवार, विकास पाटील, विलास चौधरी, नुकुल माळी, विजय बारी, दिलीप फेगडे, कार्तिक माळी, चेतन सपकाळे, मंदार चव्हाण, गणेश चौधरी आदी तरूणांनी परिश्रम घेतले. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मात्र कोरोना संसर्गाचे सावट संपुष्टात येत असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.