Home Cities चोपडा चोपडा येथे ज्ञानेश्वरी पारायण व भावदर्शन निरूपण सोहळ्याचे आयोजन

चोपडा येथे ज्ञानेश्वरी पारायण व भावदर्शन निरूपण सोहळ्याचे आयोजन

0
142

dnyaneshwar 1

चोपडा प्रतिनिधी । शहरात संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने येत्या दि. 9 ते 22 डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी ९ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी २ ते ५ या वेळेत ज्ञानेश्वरी भाव दर्शन निरूपण सोहळा तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम नगर, चोपडा येथे आयोजित करण्यात आला आहे.

हरिभक्त परायण रवींद्र महाराज दहिवेलकर, तालुका साक्री यांच्या अमृतमय वाणी द्वारा निरुपण सादर होणार असून या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेचे अध्यक्ष के.डी.चौधरी, उपाध्यक्ष टी.एम.चौधरी, सचिव भिका खंडू चौधरी, सहसचिव प्रशांत सुभाष चौधरी, कोषाध्यक्ष राजेंद्र गणपत चौधरी व सदस्य डिगंबर चौधरी, संजय चौधरी, नंदू चौधरी, एफ.ई.चौधरी, नारायण चौधरी, विनोद चौधरी, लक्ष्मण चौधरी, आबा चौधरी, छोटू चौधरी, महेंद्र चौधरी, अनिल चौधरी, देवकांत के.चौधरी, किरण चौधरी, रविंद्र चौधरी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound