यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मूळ कवी महर्षी वाल्मिक यांची जयंती रविवार 9 ऑक्टोबर 22 रोजी साजरी करण्यासाठी यावल तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार 7 ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 12 वाजता जिनीग प्रेस सभागृहात संदिप सोनवणे, सरपंच वढोदा प्र. यावल यांचा अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
महर्षि वाल्मीक जयंती साजरी करणे,मोटार सायकल रँली काढणे, समाजातील उकृष्ट काम करणाऱ्या समाज बांधव,गुणवंत विद्यार्थी सत्कार ,सेवानिवृत सैनिकांचा सत्कार,विविध पुरस्कार मिळालेल्या महिला व पुरुष यांचा गौरव करणे या सह विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यावल एस.टी.आगारातील कर्मचारी बांधव, विविध संस्थाचे पदाधिकारी सह समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदुभाऊ सोनवणे रीधुरी, विकास सोळके कोळन्हावी, खेमचंद कोळी पाडळसा, राहुल तायडे बामणोद, गजानन कोळी पीप्री, प्रदिप कोळी भालोद, समाधान सोनवणे थोरगव्हाण, प्रमोद कोळी शिरसाड, गोटुभाऊ सोनवणे शिरसाड, प्रतापदादा सोनवणे पथराडे, बबलुभाऊ कोळी कीनगाव, कीरण कोळी दहिगाव, गोकुळ कोळी मनवेल, संदिप कोळी बोरावल, मोहनभाऊ सपकाळे पीप्री, अनिल कोळी साकळी, रतनभाऊ कोळी भालशिव, चिंधू तावडे, मुकुंदा कोळी, नामदेव कोळी, वासुदेव कोळी, बापु तायडे पाडळसे, जितेंद्र कोळी भालोद, शरद कोळी, अमर कोळी, जालंधर कोळी, भरत कोळी, सुनिल नन्नवरे यावल, योगेश कोळी अट्रावल, भगवान कोळी विरोदा यांचासह समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.