Home धर्म-समाज किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करा – मराठा आत्मसन्मान अभियान पदाधिकाऱ्यांची मागणी

किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करा – मराठा आत्मसन्मान अभियान पदाधिकाऱ्यांची मागणी

0
145


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलिस दलातील एल. सी. बी. चे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांचे केवळ निलंबन करण्यात आले असून त्यांना तात्काळ अटक करुन तुरुंगात पाठवा, या मागणीचे निवेदन आज दि. ६ आॅक्टोबर रोजी मराठा आत्मसन्मान अभियानाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले.

निवेदन देते प्रसंगी हरिभाऊ पाटील, किशोर डोंगरे, सुनिल पाटील, मुकेश तुपे, जिभाऊ पाटील, अनिल मराठे, रविंद्र पाटील, जयदेव पाटील, रविंद्र देवरे, दिपक मुळे, भिमराव पाटील, शशिकांत मोरे, गजमल पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, सुयश पाटील, पवन पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील शुभम पाटील, गणेश पाटील सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. किरणकुमार बकाले यांना तात्काळ तुरुंगात न कोंबल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

तसेच निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव, पोलिस महासंचालक (मुंबई), पोलिस अधीक्षक (जळगांव), पोलिस उपअधीक्षक (पाचोरा), तहसिलदार (पाचोरा), पोलिस निरीक्षक (पाचोरा) यांना पाठविण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound