मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आज येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये बुलढाणा, जळगाव जिल्हा आणि जळगाव जामोद येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. जगदीश पाटील ( उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल) मुक्ताईनगर यांनी सांगितले की, डॉक्टर लोकांचे सामने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेले असल्याने स्टेडियमवर उपस्थित डॉक्टरांचे संग बघून नक्कीच डॉक्टर दिसत नाहीत. कारण प्रत्येक संघातील डॉक्टरांचा फिजिकल फिटनेस हा वाखनण्याजोगा असल्याने भविष्यातही अशाच प्रकारे समाजाचे स्वास्थ्य रक्षण करताना स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेत राहावे व नेहमीच असेच उत्साही व आनंदी रहावे अशा शुभेच्छा देताना भावना व्यक्त केल्या आहेत.
आजच्या सामन्यांचे उद्घाटन करताना मेडीकल असोशियन चे अध्यक्ष डॉ.विक्रांत जयस्वाल व उद्घाटक म्हणून सर्वात सीनियर प्रॅक्टिशनर डॉक्टर सी.एस.चौधरी, डॉ.जगदीश पाटील, डॉ. गोरे, डॉ. योगेश राणे, वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. सी.एस.चौधरी यांनी दीपप्रज्वलन करून सामन्यांना सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सर्व संघांनी स्पोर्टस् मॅन स्पीरिट दाखवून सामने खेळायचे व यशवंत व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या. यानंतर स्टॉस करताना डॉ.जगदीश पाटील यांनी संघाच्या कॅप्टनला सोबत घेऊन नाणे फेक केले व दोघ संघाना शुभेच्छा देत सामना सुरु झाले.