मुक्ताईनगर प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयमार्फत जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन सभागृहात जिह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी एक दिवसीय “वाणिज्य उत्सव” (Exporter’s Conclave) चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांनी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन करून संवाद साधला.
कार्यक्रमाचे भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचं हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमात “आजादी का अमृत महोत्सव” संकल्पना व निर्यात प्रचालन उपक्रमाचे महत्व, निर्यात संबंधी विविध टप्पे व प्रक्रिया या अनुषंगाने मार्गदर्शन, जिल्हा निर्यात हब म्हणून विकसित होण्यसाठीचा आरखडा चर्चा, शिफारस कृषी प्रक्रिया उद्योगासंबंधी चर्चा, निर्यात प्रचलन परिषदा यांचे मार्गदर्शन, निर्यातक्षम उत्पादने व सेवा यांच्या अनुषंगाने चर्चा, जिल्ह्यातील निर्यातदारांचे चर्चासत्र व अनुभव (अन्नप्रक्रिया उद्योग / प्लास्टिक व पॉलिमर उद्योग) तसेच निर्यात वाढीसाठी केंद्र व राज्य शासन यांच्या योजना व प्रोत्साहने (नवीन सुरु होणाऱ्या उद्योगांसाठी स्टार्टअप), निर्याती अंतर्गत बँका / वित्तीय संस्था यांची भुमिका व सहाय्य यासारख्या विषयांवर वक्ते, अधिकारी व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, प्रकल्प अधिकारी आत्मा संभाजी ठाकूर, केळी संशोधन केंद्र मुरादाबाद, शास्त्रज्ञ डॉ.सी.डी.बडगुर्जर, में. कृष्णा पेक्टीन्स, एमआयडीसी जळगावचे डॉ. कृष्णा पाटील, सुप्रिम इंडस्ट्रीजचे एक्सपोर्ट मॅनेजर प्रकाश झंवर, प्लास्टिक निर्यातदार ओमप्रकाश सिंग, जागतिक संशोधक इंक्यूबेशन केंद्र उमवि जळगांव विकास गिते, मु. का. अ. इंक्यूबेशन केंद्र उमवि जळगाव मनवनसिंग चड्डा, इंक्यूबेशन केंद्र उमवि जळगाव व्यवस्थापक निखिल कुलकर्णी, बँक ऑफ बडोदा विभागीय अधिकारी अशोकभाई वाघेला, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जळगांव व जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी उपस्थित होते.