ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंन्डस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शिरसोलीरोड दरम्यान असलेल्या जैन व्हॅली येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट रोजी या दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री यांनी शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

त्यांनी दिलेल्या प्रस्तुती पत्रकात म्हटले आहे की, जळगाव शहरानजीक असलेल्या जैन व्हॅली मधील गांधी तीर्थ येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील राज्य कार्यकारणी मधील ५ विभागाचे कार्यकारणी सदस्य जिल्ह्यातील आणि तालुकापातळीवरील एकूण ३०० हून अधिक सादर या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन हे उपस्थित राहणार असून याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.  यामध्ये अभ्यास वर्गात विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक तसेच प्रदीर्घ अनुभव असणारे व्यक्ती हे विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी मुंबई ग्राहक पंचायतचे शिरीष देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या राज्यव्यापी अधिवेशनाचा समारोप करण्यात येणार आहे. शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असणारे उद्योजक, व्यापारी, श्रमिक, शेतकरी आणि ग्राहक यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने सन्मान होणार आहे.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक विभागाच्या डॉ.अजय सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष मनोज जैन, सतीश गडे, डॉ. सोनगीरकर, जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री, गुरूबक्ष जाधवानी, महेश चावला आदी परिश्रम घेत आहे.

Protected Content