पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. यानिमित्त फाउंडेशन तर्फे १ डिसेंबर रोजी आर.टी.लेले हायस्कूल पहूर तालुका जामनेर येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सिल्वर जुबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध ह.भ.प. प्रा.डॉ. योगिता चौधरी M.com,set (PHD) व प्रा.डॉ.गोपाल वानखेडे MD (Ayu)पहूर यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. तेज ज्ञान फाउंडेशन तर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याचे उद्दिष्टाला एक नवीन दिशा दिली या महोत्सवात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.