
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नेरी दिगर परिसरात मुलांच्या वादातून झालेल्या रागाचा बदला घेण्यासाठी एका टोळीने एकाच्या घरात घुसून तोडफोड करत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील वातावरण तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सीताराम कोळी (वय ५५, रा. सोनार गल्ली, नेरी दिगर) यांचा मुलगा गजानन कोळी व गावातील इतर मुलांनी मिळून रुपेश पाटील याला मारहाण केली होती. या मारहाणीचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून अशोक कोळी यांच्या घरावर हल्ला चढवला.
तोडफोड आणि लूटमार
आरोपींनी फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. संतापलेल्या या टोळीने घरातील जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. एवढ्यावरच न थांबता, घरातील डब्यात ठेवलेली ८० हजाराची रोकड, ६० हजारांची सोन्याची पोत, २५,००० रुपयांच्या सोन्याच्या बाळ्या आणि १२, हजारांची चांदीची कडी असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
गुन्हा दाखल आणि तपास
याप्रकरणी पोलिसांनी मुकेश कडू पाटील, भूषण रवींद्र पाटील, किरण नाना पाटील, जितेंद्र युवराज पाटील, धीरज राजूचा मुलगा, शुभम नाना पाटील यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



