जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाजंरापोळ नेरीनाका येथील गो-शाळेत दि. ४ ते १० सप्टेंबर रोजी श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री मेवाड महामण्डलेश्वर श्री महंत श्री १००८ चेतनदासजी महाराज चे कृपापात्र शिष्य श्रध्देय संतश्री अनुजदासजी महाराज यांच्या मुखातून प्रवाहीत सत्संग ज्ञानयज्ञ श्रीमद भागवत सप्ताह रोज सूरू राहणार आहे.
यावेळी दि ४ रोजी दुपारी २ वा पारेख उद्यान येथील गोवर्धन हवेली येथून शोभायात्रा प्रारंभ होवून नेरीनाका गोशाळेत समापन होणार आहे. दि ४ ते १० संप्टेबर दरोरोज दु २ ते ६ या वेळेत होणार आहे. दि. ४ रोजी गोकर्ण उपाख्यान भागवत महात्म्य,व्यास नारद संवाद, शुक्रमुनी आगमन, वराह अवतार, दि. ५ रोजी कपिल अवतार, शिव विवाह, धु्रव आख्यान, भरत चरित्र, दि. ६ रोजी नृसिंह अवतार,समुद्र मंथन, कथा गजेंद्र मोक्ष, दि. ७ रोजी वामन अवतार, सुर्यवंश वर्णन, रामजन्मोत्सव,चंद्रवंश वर्णन, कृष्ण जन्म, दि ८ रोजी नंद उत्सव, बाललीला वर्णन, गोवर्धन पूजा, कंसवध, दि ९ रोजी गोपीगीत वर्णन, महारास कृष्ण—रूक्मीणी विवाह, सुदामा चरित्र तर १० रोजी श्रीकृष्ण—उध्दव संवाद, भागवत धर्म निरूपण, श्री सत्यनारायण व्रतकथा, कथा विराम इ कार्यक्रम होणार असून जास्तीत नागरिकांनी सप्ताह व शोभयात्रेत सामील व्हावे, असे आवाहन दिलीपभाई, प्रितेशभाई आणि प्रफुल्लभाई व झिंझुवाडीया सोनी परिवाराने केले आहे. या सप्ताहात दरोरोज श्रध्देय संतश्री अनुजदासजी महाराज श्रीमद भागवत कथा सांगणार आहे.